Monday, November 24, 2014

इब्सेन

'साहित्य' च्या विंगेत
उभा होता इब्सेन,
परंपरेचं पिकलं पान,
बिन केसांचा म्हातारा,
रूढींचा आंधळा...
कमानी जात्यावर,
भरडत होता गीत,
संकेताचं...


तिकडून आलं पात्र,
मरतुकडं
इंटररिलेशनची
लूत भरलेलं,
मेलोड्रामाचे
गँगरीन झालेलं,


आणि खाऊ लागलं मीठ
नाटकाचं त्याच्या .....


- बारकवी

No comments:

Post a Comment